esakal | वडील शाळेत जाऊन मुलीला म्हणाले चल आईला घेऊन येऊ, अन्‌ केले हे...
sakal

बोलून बातमी शोधा

Father tries to kill daughter in school area

मुलगी गावात आजीकडे राहत होती. आपल्याला आईला आणण्यासाठी गावी जायचे आहे, तू माझ्यासोबत चल, असे वडिलांचे म्हणणे होते.

वडील शाळेत जाऊन मुलीला म्हणाले चल आईला घेऊन येऊ, अन्‌ केले हे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शाळेत भेटण्यासाठी आलेल्या वडिलासोबत बोलण्यास मुलीने नकार दिल्याने चिडलेल्या वडिलाने वर्गखोलीत शिरून मुलीला मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. तीन) दुपारी तीनला येरंडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली.

अश्‍विनी मनोज शेडमाके (वय 11) असे जखमी मुलीचे नाव आहे. मनोज शेडमाके याचा पत्नीसोबत वाद झाला होता. रागामुळे महिला माहेरी निघून गेली. मुलगी गावात आजीकडे राहत होती. आपल्याला आईला आणण्यासाठी गावी जायचे आहे, तू माझ्यासोबत चल, असे वडिलांचे म्हणणे होते.

हायजॅक विमानातून प्रवाशांची सुटका; पाच दहशतवाद्यांचा खात्मा!

मात्र, मुलीने वडिलासोबत बोलण्यास नकार दिल्याने चिडलेल्या वडिलाने वर्गखोलीत प्रवेश केला. हातातील काठीने मुलीच्या डोक्‍यावर, कपाळावर, चेहऱ्यावर मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली.

मुख्याध्यापक सुभाष जयवंतराव चौधरी (वय 54, रा. येरंडगाव) यांनी पारवा पोलिसांत तक्रार दिल्याने मनोज महादेव शेडमाके (वय 38, रा. येरंडगाव, ता. घाटंजी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. घटनेची गंभीर दखल घेत मनोज शेडमाकेला अटक केल्याची माहिती पारवाचे ठाणेदार गोरख चौधर यांनी दिली.

loading image
go to top