सराफा व्यावसायिकांत भीती... कशामुळे? वाचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

केंद्र सरकारने सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी बीआयएस हॉलमार्किंग सक्तीचे केलेले असताना त्यात काही त्रुटी आहेत. त्या दूर न केल्यास विदर्भातील 30 ते 40 टक्के ज्वेलर्सचे व्यवसाय बंद होण्याची भीती सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

नागपूर : दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वांत प्रिय आणि मौलिक अलंकार. एखादा दागिना टीव्हीवर एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंगावर दिसतो आणि लगेच लोकप्रिय होतो. त्या दागिन्याचे डिझाइन, त्याचा पोत याबद्दल स्त्रियांमध्ये लगेच चर्चा व्हायला सुरू होते. तसाच दागिना आपल्याला मिळावा याची मागणी घरी केली जाते. जास्त सोन अंगावर घातले तर चोरी होण्याची भीती असते. त्यामुळे महिला गर्दीच्या ठिकाणी सोन घालून जाने पसंद करीत नाही. मात्र, आता सोन्यामुळे सराफा व्यावसायिकांत भीती निर्माण झाली आहे. 

केंद्र सरकारने सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी बीआयएस हॉलमार्किंग सक्तीचे केलेले असताना त्यात काही त्रुटी आहेत. त्या दूर न केल्यास विदर्भातील 30 ते 40 टक्के ज्वेलर्सचे व्यवसाय बंद होण्याची भीती सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. सोन्याचे दागिने आणि कलाकृतींच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र बीआयएसने दिल्यानंतर त्याची विक्री करण्याची परवानगी ज्वेलर्सला मिळणार आहे. नियमाचे पालन करण्यासाठी ज्वेलर्स तयार आहे.

 

जाणून घ्या - जीपने केला पाठलाग अन्‌ मंगेशचा झाला गेम

 

प्रमाणित केलेल्या दागिन्यांमध्ये शुद्धता कमी असल्याचे आढळून आल्यास ज्वेलर्सवर कारवाई करण्यात येणार आहे, हे अयोग्य आहे. बीआयएसच्या प्रयोगशाळेत दागिन्यांची शुद्धता तपासल्यानंतर त्या दागिन्यांची विक्री सराफा व्यवसायिकांकडून करण्यात येते. दागिन्यांची शुद्धता कमी असल्यास बीआयएसने त्याला प्रमाणित करू नये. मान्यता दिलेले दागिने विक्रीसाठी ठेवल्यानंतर त्याची शुद्धता कमी असल्यास सराफा व्यावसायिकाला दोषी धरण्यात येणार आहे. हा नियम पाळला नाही तर एक लाखाचा दंड आणि एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे.

 

हेही वाचा - असं घडायला नको होत जी...  

 

ज्वेलर्स हॉलमार्किंगचे पालन करण्यास तयार आहे. बीआयएसने प्रमाणित केलेल्या दागिन्याची शुद्धता तपासल्यानंतरही ज्वेलर्सवर कारवाई करण्यात येणार असेल तर आम्हीच आमच्या गॅरंटीवर दागिने विक्री करण्यास तयार आहे. तेव्हा हॉलमार्कची सक्ती का असा प्रश्‍न सराफा व्यावसायिक राजेश रोकडे यांनी उपस्थित केला आहे. 

व्यावसायिकांना दोषी धरणे अयोग्य
प्रमाणित करणाऱ्या संस्थेला सोडून सराफा व्यावसायिकांना दोषी धरणे अयोग्य आहे. याला सराफा व्यावसायिकांचा विरोध आहे. यामुळे सराफा व्यावसायिकांसमोर व्यवसाय करताना नवीन आव्हान उभे ठाकले आहे. यात सुधारणा करणे आवश्‍यक आहे. अन्यथा सराफा व्यावसायिकांना व्यवसायातून पळ काढतील. 
- राजेश रोकडे, सराफा व्यावसायिक

हॉलमार्कच्या नगावर चार चिन्हे असतात

  • बीआयएसचा लोगो 
  • कॅरेटचा आकडा (उदाहरणार्थ 22 कॅरेट वगैरे) 
  • परीक्षण करणाऱ्या संस्थेचे चिन्ह चार घडणावळीचे वर्ष 
  • सोनार किंवा पेढीचा लोगो

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fears among gold sellers