लिंक फॉलो केली अन्‌ लागला दीड लाखाचा चूना 

Smartphone
Smartphone

अमरावती : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानामुळे दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सुखकर झाल्या आहे. अगदी घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्यूटरच्या माध्यमातून हवे ते ऑनलाईन मागवता येते. असाच एक प्रयत्न एका डॉक्‍टर महिलेच्या अंगलट आले आहे. 

पत्नीने कुरिअर सर्व्हिसची साइट गुगलवरून सर्च केली. संपर्क साधणाऱ्या मोबाईल धारकाने पाठविलेली ऑनलाइन लिंक पतीने फॉलो केली. त्यानंतर काही मिनिटात पतीच्या बॅंक खात्यामधून 1 लाख 49 हजार 997 रुपयांची रोकड परस्पर दुसऱ्या खात्यात वळती केली. 

डॉ. पत्नीच्या पार्सलचा पतीला फटका 
डॉ. प्रवीणा घनश्‍याम व्यास (वय 35, रा. मेहरबाबा कॉलनी, अमरावती) असे फसवणूक झालेल्या महिला डॉक्‍टरचे नाव आहे. सदर महिलेने डी.टी.डी.सी. कुरिअरद्वारे एक पार्सल मागविले होते. बऱ्याच दिवसांपासून हे पार्सल पेडिंग होते. सदर पार्सलबाबत संपर्क करण्यासाठी महिला डॉक्‍टरने आधी कस्टमर केअरचे नंबर गुगल वेबसाइट वरून मिळवले. त्यावरून संपर्कसुद्धा साधला. 7364069783 क्रमांकांच्या मोबाईल धारकाने महिला डॉक्‍टरसोबत त्याबाबत चर्चा केली. पार्सल प्राप्त करण्यासाठी मोबाईल धारकाने महिला डॉक्‍टरच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून, त्यावरून संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

महिलेने हा घटनाक्रम पतीला सांगितला. तिला आलेली ऑनलाईन लिंक आपल्या पतीला पाठविली. पतीने पत्नीने पाठविलेली लिंक फॉलो केली असता, काही मिनिटांतच पतीच्या बॅंक खात्यामधून एक लाख 49 हजार 997 रुपये एवढी रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर वळती झाली. याप्रकरणी महिला डॉक्‍टरने सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला, पोलिसांनी संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com