चंद्रपूर : चालबर्डी परिसरात आढळला वाघिणीचा मृतदेह | Tiger Death | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiger

चंद्रपूर : चालबर्डी परिसरात आढळला वाघिणीचा मृतदेह

भद्रावती (जि. चंद्रपूर) : भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (कोंढा) परिसरातील एका रस्त्यालगत एका वाघिणीचा (Tiger) कुजलेल्या स्थितीत सोमवारी (ता. ३) मृतदेह (Deth Body) आढळून आला. या घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे. एखादा शेतशिवारात या वाघिणीचा मृत्यू झाला असावा. त्यानंतर तिचे शव रस्त्यालगत टाकण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. दरम्यान, या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला असून तपास सुरू केला आहे. (Female Tiger Death Body in bhadravati Chandrapur)

अंदाजे चार वर्ष वयाची ही वाघीण कुजलेल्या स्थितीत रस्त्यालगत मृतावस्थेत आढळून आली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. वाघिणीच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. चालबर्डी परिसरात जंगल नाही. मात्र, भद्रावती तालुक्यातील पूर्वेकडील परिसर जंगलव्याप्त आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर वाघ, बिबट यासह अन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. मात्र, ज्या भागात वाघीण मृतावस्थेत आढळून आली.

हेही वाचा: पुसेगाव : बैलबाजार भरू न दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ

अधिवासासाठी पोषक वातावरण

वाघिणीचा मृतदेह सापडला त्या ठिकाणापासून काही अंतरावर तेलवासा, कुणाडा गाव आहे. या गावात पूर्वी कोळशाच्या खाणी होत्या. त्या आता बंद असून या भागात सध्या मोठ्या प्रमाणावर झुडुपे वाढली आहे व पाण्याचीही सुविधा आहे. मोर, रानडुकरासह अन्य प्राणी या भागात दिसून येतात. वाघ, बिबट्याला त्याचे भक्ष्य मिळते. त्यामुळे या भागात गेल्या काही वर्षांत वाघ, बिबट्यांची संख्या या भागात वाढली आहे. मृत वाघीण याच भागातील असावी, असा अंदाज वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :vidarbhatiger
loading image
go to top