
मानोरा : राजस्थान राज्यातून कमी किमतीत रासायनिक खते आणून ती एका नामांकित कंपनीच्या बॅगमध्ये भरून विक्री करणाऱ्या दिनेश गजानन चव्हाण याच्यावर कारवाईकरिता कृषी विभागाच्या पथकाने मानोरा पोलिस स्टेशनला ३ जूनला फिर्याद दाखल केली. मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा असून मुख्य सूत्रधारापर्यंत पोलिसांनी पोहचून शेतकऱ्यांची फसगत करणाऱ्यांना धडा शिकविण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.