कुंपण नसल्याने जनावरे मारतात रोपांवर ताव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

वैरागड (जि. गडचिरोली) : 33 कोटी वृक्षलागवड उपक्रमाअंतर्गत कढोली येथे पेसा कायद्याअंतर्गत रोपे लावण्यात आली. परंतु, योग्य प्रकारे कुंपण न केल्याने जनावर रोपे खात असून एकूणच या उपक्रमाचे तीनतेरा वाजले आहेत. राज्य शासनाच्या नियमानुसार शासकीय, निमशासकीय कार्यालयात 33 कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाअंतर्गत रोपे लावणे आवश्‍यक आहे. त्याच अनुषंगाने कढोली येथे गांगोली मार्गावर पेसा कायद्याअंतर्गत ग्राम कोष समितीच्या माध्यमातून रोपे लावण्यात आलीत. पेसा कायद्याअंतर्गत जी गावे पेसामध्ये समाविष्ट करण्यात आलीत आहेत, अशा गावांना दरवर्षी लाखो रुपयांचा निधी देण्यात येत आहे.

वैरागड (जि. गडचिरोली) : 33 कोटी वृक्षलागवड उपक्रमाअंतर्गत कढोली येथे पेसा कायद्याअंतर्गत रोपे लावण्यात आली. परंतु, योग्य प्रकारे कुंपण न केल्याने जनावर रोपे खात असून एकूणच या उपक्रमाचे तीनतेरा वाजले आहेत. राज्य शासनाच्या नियमानुसार शासकीय, निमशासकीय कार्यालयात 33 कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाअंतर्गत रोपे लावणे आवश्‍यक आहे. त्याच अनुषंगाने कढोली येथे गांगोली मार्गावर पेसा कायद्याअंतर्गत ग्राम कोष समितीच्या माध्यमातून रोपे लावण्यात आलीत. पेसा कायद्याअंतर्गत जी गावे पेसामध्ये समाविष्ट करण्यात आलीत आहेत, अशा गावांना दरवर्षी लाखो रुपयांचा निधी देण्यात येत आहे. त्या निधीतून वेगवेगळी कामे घेऊन गावाचा विकास करण्यात येतो. यावर्षी कढोली येथील ग्राम कोष समितीला चार लाखांच्यावर निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमधून गांगोली मार्गावर 33 कोटी वृक्षलागवडीअंतर्गत रोपे लावण्यात आलीत. परंतु या रोपांना योग्य प्रकारे कुंपणच नसल्याने गायी, बकऱ्या आदी जनावरे रोपांवर ताव मारत आहेत. सरकार दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवत असते. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. परंतु रोपांची योग्य प्रकारे काळजी घेत नसल्याने वृक्षलागवडीचा प्रयोग राज्यात यशस्वी होत नसल्याचे दिसून येत आहे. खरेतर रोपे लावल्यानंतर ती जगवणेही आवश्‍यक आहे. मात्र, अलीकडे राज्य सरकारचा हा उपक्रम निष्ठेने करण्याऐवजी प्रदर्शनाचा सोहळा ठरत आहे. रोपांच्या लागवडीचा कार्यक्रम घ्यायचा, त्याचे फोटो, बातमी माध्यमांमध्ये झळकवायच्या, झालच तर रोपांसोबत सेल्फी काढून फेसबूक, व्हाट्‌सऍप, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर मिरवून घ्यायचे आणि नंतर रोपांना विसरून जायचे, असे प्रकार वाढत आहेत. केवळ वृक्षलागवड करणेच नव्हे, तर रोपांचे रक्षण, जतन, संवर्धन व ही रोपे सक्षम होईपर्यंत काळजी घेणेही गरजेचे आहे. पण, हा विचार फारसा होताना दिसत नाही. येथेही ग्रामपंचायतीने वृक्षारोपण करून रोपांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निसर्ग संवर्धनाच्या उदात्त हेतूलाच गालबोट लागल्याचे दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fever hits the plants because there is no fence