esakal | धक्कादायक! अल्पवयीन मुलीला खांद्यावर उचलून नेले मक्याच्या पिकात अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

crime story.jpg

संग्रामपूर तालुक्यातील शिवाजी नगर येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलगी शेतात काम करण्यासाठी गेली होती.

धक्कादायक! अल्पवयीन मुलीला खांद्यावर उचलून नेले मक्याच्या पिकात अन्...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावातील एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी करून अतिप्रसंग करण्यात आला. हा प्रकार 22 एप्रिल रोजी लाडणापूर शिवारात घडला. यासंदर्भात सोनाळा पोलिस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला शेत शिवारात उपस्थित काही नागरिकांनी चांगलाच चोप देत जखमी केल्याची ही चर्चा आहे.

याबाबत प्राप्त माहिती नुसार, संग्रामपूर तालुक्यातील शिवाजी नगर येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलगी शेतात काम करण्यासाठी गेली असता लाडणापूर शिवारातील गलसिंग डूडवा यांच्या शेतात काम करत असताना त्या शेतामध्ये आरोपी दगंलसिंग सूरसिंग कलच्छा अचानक आला व शेतामध्ये काम करीत असलेली अल्पवयीन मुलीला खांद्यावर उचलून मक्यामध्ये घेऊन गेला.

महत्त्वाची बातमी - काय म्हणता? आपत्तीचे रुपांतर केले इष्टापत्तीत! वाचा कसे...

तेथे तिच्यावर बळजबरी केल्याचा प्रकार घडला. पीडित मुलीने आरडा ओरडा केल्याने शेत शिवारात उपस्थित नागरिकांनी त्या नराधमाला चांगलाच चोप दिला. त्यात तो जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती सोनाळा पोलिस स्टेशनला प्राप्त होताच ठाणेदार अमर चोरे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटना स्थळावर जाऊन पाहणी केली. 

हेही वाचा - Video : ‘कोरोना’त मद्यपींचे वांदे झाल्याने घडतायेत असे धक्कादायक प्रकार?

आरोपीचा चोप दिल्याने गंभीर दुखापत
पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादी वरून आरोपी दंगलसिंग कलच्छा रा. शिवाजी नगर यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला चांगलाच चोप दिल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास सोनाळा पोलिस स्टेशनचे पीएसआय प्रकाश पवार करीत आहेत.

loading image
go to top