दारू पकडली आणि झाला घोळ, पुढे काय झाले...वाचा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : पोळा व करीच्या दिवशी शहरात व आसपासच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी, गावठीसह विदेशी दारूची अवैध विक्री झाली. काहींनी दुसऱ्या दारूविक्रेत्याची माहिती पोलिसांना देऊन कारवाई करण्यास भाग पाडले. त्यावरून दोन गटांत सशस्त्र चकमक उडाली. त्यात चौघे जखमी झाले. ही घटना फ्रेजरपुरा हद्दीतील मासोद गावात घडली.


मासोद येथे उडालेल्या सशस्त्र कमकीत परस्परविरुद्ध तक्रारीवरून पोलिसांनी एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. गुणवंत आनंद खंडारे, सुधीर खंडारे, नीलेश दिनेश बोरकर व त्यांच्या कुटुंबातील अन्य दोन सदस्य या घटनेत जखमी झाले. गुणवंत खंडारे हे घरासमोरच्या गाडगेबाबा मंदिराजवळ उभे असताना त्याठिकाणी उमेश प्रल्हाद बोरकर, दिनेश बोरकर, रोहन बोरकर, प्रतीक बोरकरसह अन्य काही लोक जमा झाले. त्यांनी पोलिसांना त्यांच्या अवैध दारू व्यवसायाची माहिती देऊन कारवाई करण्यास भाग पाडले, असा संशय घेऊन वाद घातला.

लाकडी फळीसह दगड, काठ्यांनी वार करून गुणवंत व सुधीर खंडारे यांना जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परस्परविरुद्ध बाजूने नीलेश बोरकर यांनी तक्रार दिली. त्यात बोरकर व खंडारे कुटुंबीय एकाच गावात राहत असून त्यांचा काही वर्षांपूर्वी दारूचा व्यवसाय होता. नीलेश याच्या काकासोबत काही लोक वाद घालून मारहाण करीत होते. तेथे मध्यस्थीसाठी गेलेल्या नीलेशसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत गुणवंत खंडारे, बाळासाहेब खंडारे, सुधीर खंडारे, छोटू खंडारे (सर्व, रा. मासोद) आदींनी लोखंडी अँगलसह काठीने मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
 

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com