esakal | क्षुल्लक कारणावरून राडा; पोलिसांसोबत बाचाबाची
sakal

बोलून बातमी शोधा

fight in akola.jpg

हाणामारी करणाऱ्या दोनशे ते अडीचशे जणांच्या जमावाने लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्याने हल्ला चढविल्याने यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले.

क्षुल्लक कारणावरून राडा; पोलिसांसोबत बाचाबाची

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जठारपेठ चौकातील एका मद्यविक्रीच्या दुकानासमोर दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काहीजण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता.15) रात्री नऊ वाजता दरम्यान सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांतर्गंत घडली. या घटनेंत दोनशे ते अडीच जणांच्या जमावाने लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याने काही जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांतर्गंत येणाऱ्या राऊतवाडी चौकामध्ये अपघाताच्या कारणामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारी करणाऱ्या दोनशे ते अडीचशे जणांच्या जमावाने लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्याने हल्ला चढविल्याने यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले. तर यावेळी वृत्त संकलन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनधींनाही मारहाण करण्यात आली. तर घटनेच्या काही वेळेनंतर सिव्हिल लाईन्स पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. तर यावेळी चौकात राडा करणाऱ्यां काहींनी पोलिसांना पाहून पळ काढला मात्र, यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान दाखवित राडा करणाऱ्या टोळक्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यांत घेऊन आले.

महत्त्वाची बातमी - दिंडी मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच; प्रशासन जागणार तरी कधी?

शहर उपविभागीय पोलिसांनी गाठले पोलिस ठाणे
घटनेची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम आणि त्यांच्या ताफ्याने सिव्हिल लाईन्स पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती घेतली. तर चौकात राडा करणाऱ्यांच्या शोधार्थ डी.बी.पथकाला रवाना करण्यात आले. तर याप्रकरणात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशीही माहिती दिली.

पोलिस ठाण्यांत बाचाबाची
राडा करणाऱ्यांना चौकातून उचलून पोलिसांनी काही जणांना पोलिस ठाण्यांत आणले. यावेळी काहींनी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाणे गाठून पोलिसांसोबत वाद घालून बाचाबाची केली. मात्र, सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांतील पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी या टोळक्याचे एक न ऐकता पोलिसी खाक्या दाखवित अनेकांना पोलिस ठाण्यांत दाखल केले.

माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की
यावेळी वृत्त संकलन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या दोन प्रतिनधींनीसोबत जमावाने व्हिडीओ कशाला काढतो म्हणत वाद घातला. तर यावेळी माध्यम प्रतिनिधींनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला तर जमावाने त्या माध्यम प्रतिनिधींनाही मारहाण केली.

loading image