गेल्या वर्षभरात बेशिस्त वाहनचालकांकडून तब्बल 1 कोटीचा दंड वसूल; 87 हजार वाहनचालकांवर कारवाई

Fine of rupees 1 crore took from people for not following traffic rules
Fine of rupees 1 crore took from people for not following traffic rules

अमरावती ः शहरात अद्यापही विना नंबरप्लेट, फॅन्सी नंबरप्लेटची वाहने मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असल्याचे दिसून येते. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून वाहतूक पोलिसांनी 2020 मध्ये 1 कोटी 11 लाख 61 हजार 850 रुपयांचा दंड वसूल केला.

वाहतूक शाखा पूर्व व पश्‍चिम विभागाने ही कारवाई केली. 87 हजार 901 प्रकरणांमध्ये ड्रंकऍण्ड ड्राईव्हच्या वर्षभरात 64 जणांविरुद्ध कारवाई केल्या. अवैध प्रवासी वाहतुकीची 89 प्रकरण, वेगात वाहन चालविणाऱ्या 4 हजार 831 प्रकरणे, वीणा परवाना वाहन चालविणाऱ्या 973 जणांविरुद्ध कारवाई केली. 

या व्यतिरिक्त शहराच्या विविध कोपऱ्यात मुख्य रस्त्यांवर वाहने अवैधरीत्या पार्क केल्या जातात. ही वाहने पोलिसांच्या वाहनाने उचलून नेलीत. अशी जवळपास 9 हजार 396 प्रकरणे आहेत. प्रवेश बंदीचे उल्लंघन करणे, पोलिसांच्या आदेशाची अवहेलना करण्याची जवळपास 1 हजार 519 प्रकरणे आहेत. 

शिवाय ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या ही वर्षभरात 3 हजार 68 होती. त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्या गेली. जानेवारी ते डिसेंबर 2019 मध्ये 46 हजार 33 प्रकरणामध्ये 98 लाख 86 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला होता. परंतु सन 2020 मध्ये 87 हजार 901 प्रकरणात 1 कोटी 11 लाख 61 हजार 850 रुपये दंड वसूल करण्यात आला.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com