esakal | आदेशाचे केले उल्लंघन बसला हा दंड...वाचा...

बोलून बातमी शोधा

FIR against vendor

कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांविषयी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत पानटपरी सुरू ठेवणाऱ्या पानटपरी चालकांवर गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला

आदेशाचे केले उल्लंघन बसला हा दंड...वाचा...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांविषयी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पानटपरी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यात दाखल झालेला हा पहिलाचा गुन्हा आहे.

कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांविषयी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत पानटपरी सुरू ठेवणाऱ्या पानटपरी चालकांवर गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचे नाव विनय दिनेश चौरसिया (वय 38) आहे. जिल्ह्यातील ही पहिली घटना असल्याने अवैधरीत्या पानटपरी सुरू करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

बहुऔषधी गुणधर्मामुळे या हळदीला मिळतोय अधिक भाव

कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना म्हणून गोंदिया जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व पानटपरी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला धुडकावून रामनगर येथील कुडवा नाका परिसरातील न्यू चौरसिया पान व कोल्ड्रिंग म्हणून पानटपरी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच पोलिस तिथे पोहचले असता आरोपी विनय चौरसिया याने आपली पानटपरी सुरू ठेवून त्यांच्या समोर काही लोक खर्रा खाण्यासाठी गर्दी करून उभे असताना आढळले.

गर्दीमुळे संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होण्याची शक्‍यता असल्याने गोंदिया जिल्हाधिकारी यांनी पारित केलेला साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत आरोपी विनय चौरसियावर भारतीय दंडविधान कलम 188 नुसार रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभर खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पानटपरी, रेस्टॉरंट, बार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.