कोविड रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, मृतदेह बदलल्याने निर्माण झाला होता तणाव

गुन्हा
गुन्हा e sakal

यवतमाळ : कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह (dead body of corona patient) सोपविताना अदलाबदल झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी येथील डॉ. महेश शाह यांच्या खासगी कोविड हॉस्पिटल सेंटरमध्ये तोडफोड (covid hospital vandalized) केल्याची घटना रविवारी (ता. नऊ) दुपारी घटना घडली होती. याप्रकरणी डॉ. शाह यांच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (FIR filed against people who vandalized covid hospital in yavatmal)

गुन्हा
भाग्यश्रीचं वारली पेंटिंगमधून रामायण दर्शन पोहोचलं मुख्यमंत्र्यांपर्यंत; दिली कौतुकाची थाप

डॉ. शाह यांच्या रुग्णालयात दोन कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले. त्यात यवतमाळ येथील प्रसिद्घ वकील अरुण गजभिये व आर्णी येथील पोलिस कर्मचारी शेळके यांचा समावेश होता. ऍड. गजभिये यांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांना दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यात आला. मोक्षधामात हा प्रकार उघडकीस येताच नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. हॉस्पिटलमध्ये आलेल्या जमावाने जोरजोरात आरडाओरड करीत डॉक्‍टरांच्या कॅबिनचे काच फोडले. काउंटरवर ठेवलेले मॉनिटर, स्वागत कक्षाची काच, सीसीटीव्ही कॅमेरा, आयसीयू रूमच्या दरवाजाची काच, तसेच पार्किंगमध्ये उभी असलेली कारही फोडली. यात जवळपास दोन लाखांचे नुकसान केले. तू माझ्या वडिलांचा मृतदेह समजून दुसऱ्या रुग्णाचा मृतदेह दिला, असे म्हणत डॉक्‍टरांच्या पत्नीलाही शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. शाह यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कपिल गजभिये (वय 32, रा. बाजोरीयानगर) याच्यासह अन्य पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

गुन्हा
तिसऱ्या लाटेपेक्षा मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या; वाचा काय सांगतात डॉ. गावंडे

डॉक्‍टरविरुद्ध तक्रार -

ऍड. अरुण गजभिये यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना डॉ. शाह यांच्याकडे 28 एप्रिलला भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान शनिवारी (ता. आठ) ऍड. गजभिये यांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी पॅकिंग केलेला मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अंतिम संस्काराच्या वेळी उघडून बघितले असता, तो मृतदेह दिगांबर शेळके या व्यक्तीचा निघाला. त्यामुळे मुलगा नातेवाइकांसह रुग्णालयात गेला असता, काही लोकांनी काचा फोडल्या. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह जाणीवपूर्वक देत हलगर्जीपणा केल्याचा आरोप ललित गजभिये याने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यावरून डॉ. शाह यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

विटंबना केल्याचा आरोप -

दिगांबर शेळके यांचा मृत्यू झाल्यावर दुसऱ्या दिवशी नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र, शल्यचिकित्सक कार्यालयाकडून परवानगी आली नाही, असे सांगण्यात आले. काही वेळाने मृतदेह आढळून आला नाही. त्याबद्दल डॉ. शाह यांना विचारणा केली असती, त्यांनी टाळाटाळ केली. षडयंत्र रचून डॉ. शाह यांनी मृतदेहाची विटंबना केली, असा आरोप मृताचा मुलगा शुभम शेळके याने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com