चाचणीसाठी आलेल्या आरोग्य पथकाला उपक्रेंद्रात कोंडले, यवतमाळातील धक्कादायक प्रकार

crime
crimee sakal

यवतमाळ : कोविड चाचणी (corona testing) करण्यासाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांना (health worker) ही यायची वेळ आहे का, असा जाब विचारत उपकेंद्रात कोंडले आणि वैज्ञानिक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण (misbehave with healtg worker) केली. ही घटना शनिवारी (ता. आठ) दुपारी तीन वाजता दारव्हा तालुक्‍यातील शेलोडी (shelodi darvha) येथे घडली. (fir filed against three people for misbehaved with health worker in yavatmal)

crime
आमचा वाली कोण? आइस फ्रूट, सरबत विक्रेते हतबल; उपचारासाठी पैसे नाहीत

शरदचंद्र लालसिंग पवार (वय 27, वैज्ञानिक अधिकारी) हे आपल्या पथकासह कोविड चाचणी करण्यासाठी शेलोडी येथे गेले. तिघांनी संगनमत करून ही काय तुमची यायची वेळ आहे, असे म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. आरोग्य उपकेंद्राच्या गेटला कुलूप लावून बंद केले. वैज्ञानिक आरोग्य अधिकाऱ्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी शरदचंद्र पवार यांनी दारव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ईश्वर राठोड (वय 28, रा. मुंढळ) याच्यासह अन्य दोघांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com