
वर्धेतील इंग्रज कालीन इमारतीला आग; राणीलक्ष्मीबाई यांच्या भावाने केले काम
आर्वी (जि. वर्धा) : तहसील कार्यालयाच्या इंग्रज कालीन मूळ इमारतीला (The building caught fire) गुरुवारी (ता. १३) भल्यापहाटे ३.१५ वाजताचे सुमारास आग लागली. यात कार्यालयातील महत्त्वाचे दस्तऐवज (Important documents) व संगणक यांच्यासह सुमारे ५० कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक (Service book) सुध्दा जळून खाक झाले. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असले तरी राहून राहून पेट घेत असल्यामुळे अजून तरी आग आटोक्यात आलेली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. (Fire at the building at Wardha)
रात्री गस्त घालत असलेल्या गुरख्याला तहसील कार्यालयालयाच्या इमारतीमधून धुवा व आगीचे लोळ उठताना दिसले. त्याने याची माहिती रात्र पाळीवर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो. शी. राहुल देशमुख व जयदीप मून यांना दिली. यांच्या माध्यमातून माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सांळोकी, ठाणेदार संजय गायकवाड, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, आष्टीचे तहसीलदार वानखेडे नायब तहसीलदार विनायक मगर, कदम, माने नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार, अभियंता साकेत राऊत, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले.
हेही वाचा: याला म्हणतात माणुसकी! कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास उपचाराची रक्कम परत
आर्वी नगरपरिषदेचे अग्निशामक दल लगेच पोहोचले आणि आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. यानंतर आष्टी नगर पंचायतीचे व देवळी, पुलगाव नगर परिषदेचे अग्निशामक दल सुध्दा पोहोचले. ही इमारत अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. यामुळे आग आतल्या आत भडकत होती. रोजगार हमी कार्यालयापासून लागलेली ही आग पाहता पाहता दुय्यम निबंधक कार्यालयापर्यंत पोहोचली. वरून असल्यामुळे रुमच्या आतमघ्ये पाणी पोहोचत नव्हते.
टिनावर मारलेले पाणी वरच्यावर उडून जात होते. शेवटी दिलीप कटीयारी व विरेंद्र चोरे यांची जेसीबी बोलावली. तिच्या सहायाने इमारतीवरील टीन काढले आणि मग चारही अग्निशमन दलाच्या वाहनामधून पाण्याचा मारा करून आग विझविण्याचापर्यंत सुरू झाला. अशातच तहसील व उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून रेकार्डरूममधील दस्तऐवज बाहेर काढत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात दस्तऐवज वाचविण्यात यश मिळाला. मात्र, ५० कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल व सर्व्हिस बुक वाचविता आला नाही.
हेही वाचा: शटर बंद खरेदी चालूच! आलिशानच्या दुकानात आढळले तब्बल पावणे दोनशे ग्राहक
सलग आठ तासांपासून आग विझविण्यासाठी नगरसेवक रामू राठी, समाजसेवक गौरव जाजू, नंदकीशोर जाधव, शिवा चिमोटे, नरेश आखरे, बबन बावनकर, खडसे, पुलगाव अग्निशामक दलाचे संदीप अजमीरे, कुणाल गणवीर, निखल आटे, आष्टीचे नरेश कदम, निखल वैध्य, देवळीचे ओमंकारेश्वर मुडे, अक्षय क्षीरसागर, रणजीत दाभेकर तथा अनेक लोकांचेपर्यंत सुरू आहे. आग आटोक्यात आली असली तरी ठिकठिकाणावरुन पुन्हा पेट घेत आहे.
इमारतीमध्ये राणीलक्ष्मीबाई यांच्या भावाने केले काम
जळून खाक झालेल्या इमारतीमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा भाऊ विनायक तांबे यांनी तहसीलदार पदावर कार्य करून तहसीलचा कारभार सांभाळला आहे. याशिवाय नगर परिषदेचा कारभार सुध्दा पहिले आहे.
(Fire at the building at Wardha)
Web Title: Fire At The Building At
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..