
शटर बंद खरेदी चालूच! आलिशानच्या दुकानात आढळले तब्बल पावणे दोनशे ग्राहक
नागपूर : लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) सुरू असतानाही इतवारीतील (Itwari Market) आलीशान (Alishan Showroom) या कपड्याच्या दुकानात सर्रासपणे मागच्या दाराने विक्री सुरू असल्याचे युवक काँग्रेसच्या (Youth Congress) पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणले आहे. याच एक व्हीडीओच तयार केला असून त्यात सुमारे दीडशे ते पावणे दोनशे ग्राहकांची गर्दी दिसत आहे. (over 175 customers under shutter of Alishan showroom during Lockdown)
हेही वाचा: कोरोनाची लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत
आलिशान या कपड्याच्या दुकानात कोरोनाचे सर्व नियम धुडकावून विक्रीचे व्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे युवक काँग्रेसचे सचिव नगरसेवक बंटी शेळके यांनी बनावट ग्राहक दुकानातू पाठवून व्हीडीओ शुटींग केले. गांधीबाच झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर शेळके एनएसडीच्या चमूकडे याची तक्रार करण्यात आली. त्याने बराच वेळ टाळाटाळ केली. शेवटी शेळके त्यांना घेऊन दुकानात धडकले. मात्र तब्बल २० मिनिटे आतून दरवाजा बंद करून त्यांना बाहेर ठेवले. दुसऱ्या मार्गाने ग्राहकांना बाहेर पाठवण्यात आले. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी आणि उपद्रव शोध पथकाच्या मदतीने येथील व्यवहार सुरू असल्याची शंका बंटी शेळके यांनी व्यक्त केली.
हेही वाचा: नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय नाही; यशोमती ठाकूर यांचा इशारा
लॉकडाऊनमुळे महाल, इतवारीतील सर्व दुकाने बंद आहेत. काही विशिष्ट दुकानातून व्यवहार सुरू आहे. त्यांच्यावर आजवर कारवाई करण्यात आलेली नाही. आलीशानमध्ये दिवसभरातून शेकडो ग्राहक येतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कोरोनाचा संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुकराम मुंडे महापालिके आयुक्त असेत तर नियम डावलून दुकाने उघडण्याची कोणी हिंमत केली नसती असेही बंटी शेळके यांनी सांगितले.
(over 175 customers under shutter of Alishan showroom during Lockdown)
Web Title: Over 175 Customers Under Shutter Of Alishan Showroom During
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..