esakal | भंडारा येथील उमा प्लास्टिक कंपनीला आग, लाखोंचे साहित्य जळून खाक; जीवितहानी टळली
sakal

बोलून बातमी शोधा

भंडारा येथील उमा प्लास्टिक कंपनीला आग; लाखोंचे साहित्य खाक

भंडारा येथील उमा प्लास्टिक कंपनीला आग; लाखोंचे साहित्य खाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : पवनी मार्गावरील पालगाव शिवारातील उमा प्लास्टिक कंपनीला (Uma Plastic Company) मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग (Fire the company) लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. मात्र, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. (Fire at Uma Plastic Company in Bhandara)

दवडीपारजवळ पालगाव शिवारात गिरीश पटेल यांच्या मालकीची उमा प्लास्टिक कंपनी आहे. या कंपनीत वापरलेल्या प्लास्टिकवर प्रक्रिया करून पुनरुत्पादनासाठी कच्चा माल तयार केला जातो. याच परिसरात कंपनीत काम करणारे मजूरही राहतात. नित्याची कामे आटोपून सोमवारी रात्री गाढ झोपेत असताना अचानकपणे कंपनीला आग लागली. परिसरात ठेवलेले सर्व प्लास्टिक असल्याने आगीने लवकर रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती पोलिसांना देऊन अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

हेही वाचा: नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर आग; तीन बंबांच्या मदतीने नियंत्रण

भंडारा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीच्या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, अंदाजे ४० ते ५० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची कारधा पोलिसांनी नोंद केली आहे.

(Fire at Uma Plastic Company in Bhandara)