esakal | नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर आग; तीन बंबांच्या मदतीने नियंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर आग; तीन बंबांच्या मदतीने नियंत्रण

नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर आग; तीन बंबांच्या मदतीने नियंत्रण

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : मंगळवारी दुपारच्या सुमारास नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरील (Nagpur Central Railway Station) मुंबई एंडकडील आराआरआय केबीनजवळ आग (Fire at Nagpur railway station) लागली. अल्पवधीत आगीने विक्राळ रूप धारण केल्याने रेल्वे यंत्रणेसह प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन बंबांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करीत तासभराच्या परिश्रमानंतर नियंत्रण मिळविले. (Fire at Nagpur railway station)

आरआरआय केबिनच्या अगदी विरुद्ध बाजूला फलाट क्रमांक ६ आणि ८ दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेत गवत वाढले असून, उन्हामुळे ते वाळले होते. दुपारी २.२० च्या सुमारास अचानक गवताला आग लागली. धुराचे लोळ उठू लागताच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्‍यांनी घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. फायर इन्स्टिग्युशरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, आग पसरत होती. यामुळे अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.

हेही वाचा: चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

काही मिनिटातच एका मागोमाग तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच जोराचे वारे वाहत असल्याने आग अधिकच वाढत होती. तासाभराच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. आगीत रेल्वेच्या २० ते २५ लाकडी स्लीपर जळाल्याचे सांगण्यात येते. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन जवानांना यश मिळाले. घटनेच्या वेळी अगदी काही अंतरावर गरीब रथची रिकामी रॅक उभी होती. खबरदारीचा उपाय म्हणून ती अजनीला रवाना करण्यात आली.

(Fire at Nagpur railway station)