मूर्तिजापुरात बायोकोल प्लांटला भीषण आग

प्रा. अविनाश बेलाडकर 
शनिवार, 31 मार्च 2018

आग एवढी भीषण हाेती की, अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, कारंजा येथील अग्नीशमन बंब आणि शहरातील टँकरद्वारा आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असतानाही दुपारी एक वाजता लागलेली आग वृत्त लिहिस्तोवर चार तास उलटूनही धुमसत होती.

मूर्तिजापूर : या तालुक्यातील चिखली गावात क्विन्स लँड च्या मागच्या भागातील दिनेश बुब व संगिता बुब यांच्या मालकीच्या बालाजी ब्रिक्वेटींग प्लांट व लक्ष्मी बायोकोल प्लांटला आज दुपारी एक वाजता लागलेल्या भीषण आगीत कुटार, कोळसा कांड्या, शेड, मशीन अशी सुमारे एक कोटीच्या आसपास मालमत्ता भस्मसात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आग एवढी भीषण हाेती की, अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, कारंजा येथील अग्नीशमन बंब आणि शहरातील टँकरद्वारा आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असतानाही दुपारी एक वाजता लागलेली आग वृत्त लिहिस्तोवर चार तास उलटूनही धुमसत होती. शहरालगत चिखली गावाच्या हद्दीत क्विन्स लँड च्या मागे दिनेश बुब व संगिता बुब यांचा बालाजी ब्रिक्वेटींग प्लांट व लक्ष्मी बायोकोल प्लांट आहे. जनावरांच्या खाण्यायोग्य नसणाऱ्या सोयाबीन, तुरीचे कुटार अशा कृषी कचऱ्यापासून जैविक कोळसा (बायोकोल) बनविणाऱ्या या कारखान्याच्या मागच्या भागात डीपी आहे. या डीपीच्या ट्रान्सफॉर्मरवर स्पार्किंग झाल्याने ही आग लागल्याचे दिनेश बुब यांनी सांगितले. उन्हाची काहिली आणि वारा यामुळे आगीने क्षणार्धात उग्र रूप धारण केले.

भारिपबमसंचे संजय नाईक, नगरसेवक वैभव यादव, मोहन वसुकार, बबलु भेलोंडे यांच्यासह परीसरातील नागरिक धावून आले. आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, कारंजा येथील आग्नीशमन बांब पोचले, मात्र आग धुमसतच होती. प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर नुकसान कळेल, मात्र सुमारे एक कोटीच्या आसपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: fire in murtijapur

टॅग्स