esakal | मदन येरावर यांच्या घरासमोर आतषबाजी 
sakal

बोलून बातमी शोधा

Fireworks in front of Madan Yerawar house

- यवतमाळात फुटले फटाके 
- आता भाजपचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा 
- शिवसेनेला करावे लागणार विरोधात काम 
- सोशल मीडियावरून नागरिकांना आश्‍चर्याचा धक्का 

मदन येरावर यांच्या घरासमोर आतषबाजी 

sakal_logo
By
राजकुमार भीतकर

यवतमाळ : राज्यात भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेत येताच आज, शनिवारी (ता. 23) सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते व मागील सरकारमधील पालकमंत्री मदन येरावर यांच्या निवसस्थानासमोर कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. 

शनिवारी सर्व वर्तमानपत्रे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे सरकार सत्तेत येणार अशा आशयाच्या बातम्या घेऊन आले. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री पदाची शपथ भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी घेतल्याचा बातमी टीव्ही व वृत्तवाहिन्यांवर आणि सोशल मीडियात प्रसारित होतात लोकांना धक्काच बसला.

हा धक्का आश्‍चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. सोशल मीडियावर ती उमटली. अशी सत्ता स्थापन होईल याबाबत कुणीही भविष्यवाणी केली नव्हती व माध्यमांनाही चकवत सत्ता स्थापन झाली. राष्ट्रपती राजवटी हटली याचे लोकांना कुतूहल वाटू लागले आहे. 


जिल्ह्यातील सत्ता समीकरनेही बदलणार

भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार राज्यात आल्याने आता जिल्ह्यातील सत्ता समीकरनेही बदलणार आहेत. खासकरून जिल्हा परिषदेत आता भाजपचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या कोण्या भाग्यवान महिलेला लॉटरी लागते, हे वेळच सांगणार आहे. 

"जोर का झटका धीरे से लगे'

राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा पुन्हा विधानपरिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या समीकरणात शिवसेनेला विरोधात काम करावे लागणार असून, कॉंग्रेसला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करावी लागणार. या नव्या व अकल्पित समीकरनाचा लोकांना "जोर का झटका धीरे से लगे' याचा अनुभव आला. 

loading image