esakal | तहसील कार्यालयासमोर गोळीबार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तहसील कार्यालयासमोर गोळीबार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : शहरात दोन गटांमध्ये असलेला वाद चिघळला असून यात तहसील कार्यालयासमोरील मार्गावर पालिका मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानासमोर एका गटाच्या प्रमुखाकडून गोळीबार करण्यात आला. ही घटना रविवारी (ता. एक) घडली. या प्रकरणी हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश ऊर्फ अवी मनोहर नवरखेडे (वय 33) रा. शास्त्री वॉर्ड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
रविवारी शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकाजवळील उड्डाण पुलावर आरोपी अविनाश नवरखेडे हा आपल्या कारने जात होता. दरम्यान पुलावर मोकाट जनावरांचा मुक्काम असल्याने तो थांबला. त्याचवेळी रजनीश देवतळे (वय 25) हा दुचाकी (क्र. एमएच 49 एए 9785) ने पुलावर हॉर्न देत नवरखेडे यांच्या वाहनाजवळ आला. यात या दोघांचा वाद झाला व तू पुलाखाली भेट, असे बोलत दोघेही समोर निघाले. या नंतर नवरखेडेने आपली कार तहसील कार्यालयाच्या समोर पालिका मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानापुढे उभी केली. दरम्यान, रजनीश देवतळे हा बादल पौनिकर व कुणाल म्हैसकर यांच्यासोबत नवरखेडे याच्या कारसमोर येऊन थांबला. त्यामुळे अविनाश नवरखेडने त्याच्यावर गोळीबार केला. कोणालाही गोळी लागली नसल्याने तिघेही बचावले. तिघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी रजनीश देवतळेने पोलिसात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून अविनाश नवरखेडेला पोलिसांनी अटक केली.

loading image
go to top