
Chandrakant Patil on mother tongue education in India
Sakal
अमरावती : मातृभाषेतून शिक्षण दिल्याने संशोधनाची गती वाढून देशाचे अर्थचक्र वाढण्यास सहकार्य होते. राज्यात मराठी भाषेतून संशोधनाला गती मिळावी यासाठी शिक्षण मातृभाषेतून अर्थात मराठीतून देण्याचे धोरण नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट करण्यात आले आहे, असे स्पष्ट करतानाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इंग्रजी भाषा व्याकरणासह बोलली जात असताना मराठी मात्र अशुद्धरीत्या बोलली जात असल्याची खंत व्यक्त केली. ती सुधारण्यासाठी मराठी भाषा परिषदेचा उपयोग होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.