बाप तो बाप... बेटाभी...! सापडले पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 January 2020

महत्त्वाची बाब म्हणजे, राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहा दिवसांपूर्वी शेख आसीफचे वडील शेख छोटू उर्फ ईल्ली याने एका वकिलाच्या बंगल्यात घरफोडी केली होती. घरमालक आल्याची चाहूल लागताच वरच्या मजल्यावर चढून त्याने बाजूच्या घरावर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

अमरावती : बाहेरगावी गेलेल्या नागरिकांचे बंद घर फोडून चोरी करणाऱ्या एका बापाविरुद्ध एकूण 13 जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. महाचोर असलेल्या या बापाला पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यानंतर आपल्या बापाला त्याच्या धंद्यात मदत करण्यासाठी अमरावतीत आलेल्या मुलानेही चार दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले. 

मुलगा निघाला दुचाकी चोर 

शेख आसीफ शेख छोटू उर्फ इल्ली (वय 19, बागपिंपळगाव, जि. बीड) याला शहर कोतवाली पोलिसांनी गुरुवारी (ता. नऊ) रात्री अटक केली. शहरातील रोशन मधुकर दुसले (वय 31, रा. पोटे टाऊनशिप) यांची एमएच 27 एजी 8443 क्रमांकाची दुचाकी बसस्थानक ते रेल्वेस्थानक मार्गावरील जुन्या विश्रामगृहासमोरून चोरीला गेली होती. त्या गुन्ह्याच्या तपासात शेख आसीफ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. जप्त दुचाकींची किंमत 1 लाख 28 हजार रुपये आहे. पोलिस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र उमक, नीलेश जुनघरे, जुनेद खान, आशीष विघे, इम्रान खान यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त दुचाकी शेख आसीफने शहर कोतवाली व राजापेठ ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे चौकशीत स्पष्ट केले. 

अवश्‍य वाचा- पत्नी मोबाईलवर बोलते म्हणून पतीने बघा काय केले! 

घरफोडी करताना बाप सापडला लोकांच्या हाती 

महत्त्वाची बाब म्हणजे, राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहा दिवसांपूर्वी शेख आसीफचे वडील शेख छोटू उर्फ ईल्ली याने एका वकिलाच्या बंगल्यात घरफोडी केली होती. घरमालक आल्याची चाहूल लागताच वरच्या मजल्यावर चढून त्याने बाजूच्या घरावर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न असफल ठरला. उडी मारताना तो घराच्या गच्चीऐवजी खाली पडला आणि लोकांच्या हाती सापडला. लोकांनी त्याची येथेच्छ पिटाई केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस चौकशीत शेख छोटूने राजापेठ व गाडगेनगर हद्दीत पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडूनही लाखोंचा ऐवज जप्त केला. त्यामुळेच बापाच्या पावलावर पाऊल टाकीत मुलगाही गुन्हेगारीच्या क्षेत्रात आल्याचे बोलले जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First father... Ten son...! Police Arrested