Bhndara Fraud : दोन कोटींच्या लोभापायी दिले पाच कोटी; १० आरोपींना अटक, दोन वाहने पोलिसांच्या ताब्यात
Crime News : भंडाऱ्यात पाच कोटी रुपयांची रोकड सापडली असून, अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकासह दहा जणांना अटक केली आहे. आरोपींनी बँक खात्यात ७ कोटी रुपये जमा करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा फसवणूक सौदा केला होता.
भंडारा : तुमसर शहरातील इंदिरानगर येथील राजकमल ड्राय क्लीनिंग आर्ट या दुकानात पाच कोटी रुपयांची रोकड सापडल्याप्रकरणी अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकासह दहा जणांना पोलिसांनी अटक केली.