पेरिमिलीभट्टी जंगलात चकमक; पाच नक्षलवाद्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात पोलिस-नक्षलवाद्यांत बुधवारी (ता. 29) चमकम झाली. दरम्यान, यावेळी पळून जात असलेल्या पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली.

गडचिरोली : जिल्ह्यात नक्षल्यांच्या कारवाया सुरूच आहेत. भामरागड पोलिस उपविभागांतर्गत पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात पोलिस-नक्षलवाद्यांत चमकम झाली. दरम्यान, यावेळी पळून जात असलेल्या पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली.

पोलिस दलाच्या या कारवाईमुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

नक्षवाद्यांची नावे

रैणू सोनू वड्डे (वय 20, रा. पदमकोट ता. कोहकामेटा, जि. नारायणपूर, बंडू चक्कू वड्डे (वय 25, रा. पदमकोट, ता. कोहकामेटा, जि. नारायणपूर), सुखराम सोमा उसेंडी (वय 40, रा. उसेवाडा, ता. कोहकामेटा, जि. नारायणपूर), दोघे इरपा उसेंडी (वय 30, रा. उसेवाडा, ता. कोहकामेटा, जि. नारायणपूर), केये सायबी वड्डे (वय 40, रा. पदमकोट, ता. कोहकामेटा, जि. नारायणपूर), अशी अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. यात 2 नक्षल कुटूल एरिया दलम सदस्य, तर 3 नक्षल जन मिलिशिया सदस्यांचा समावेश आहे.

नक्षल साहित्य जप्त

अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी 3 अवजारे व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले. त्यांच्या विरोधात उपपोलिस स्टेशन लाहेरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास लाहेरी पोलिस करीत आहेत.

जाणून घ्या : मुलींनो, बाॅयफ्रेंडसोबत जाताना सावध राहा.... पडू शकते महागात

पोलिसांनी केला पाठलाग

लाहेरीपासून अंदाजे 35 किमी अंतरावर असलेल्या व छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या पेरिमिलीभट्टी जंगल परिसरात गडचिरोली पोलिस दलातील सी-60चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला असता स्वसंरक्षणार्थ व प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबार केला.

यावेळी नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून जात असताना सी-60 कमांडोंनी शौर्यपूर्ण पाठलाग करून पाच जणांना पकडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five naxlites arrested at gadchiroli district