पाच जणांचा उष्माघाताने मृत्यू?

file photo
file photo

नागपूर : काही अंशी तापमानात कमतरता झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. उकाडा वाढत चालल्याने शरीराला उन्हाचे चटके असह्य होत आहे. त्यामुळे बऱ्यांच लोकांना उन्ह्यात गेल्यामुळे जीव घाबरणे, प्रकृती अचानक खराब होणे तसेच उन्हामुळे चिडचिड वाटणे यासारखे त्रास व्हायला लागले आहेत. गेल्या 24 तासांत शहरातील तहसील, एमआयडीसी, प्रतापनगर आणि कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 5 जण मृतावस्थेत आढळून आले आहे. या सर्वांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, यातील पहिल्या घटनेत बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास लक्ष्मण शंकरराव जांभूळकर (30, रा. प्रवेशनगर), ख्वाजा एस. टी. डी. मागे, यशोधरानगर हा तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इतवारी तीननल चौक येथे बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला उपचाराकरिता मेयो हॉस्पिटल
येथे नेले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. दुसरी घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अंदाजे 50 वर्षे वयोगटातील एक अनोळखी पुरुष बुधवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास एमआयडीसी हद्दीतील नीलडोह नाल्याजवळ मृतावस्थेत
आढळून आला. तसेच तिसऱ्या घटनेत आज, गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास अंदाजे 70 वर्षे वयोगटातील एक अनोळखी महिला ही तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इतवारी पोस्ट ऑफिसजवळ बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिला उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. चौथ्या घटनेत आज, गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भोजराज नारायण भास्कर (52, रा. भीमगर, इसासनी) हे प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राधे मंगलम्‌ हॉलजवळ, कबाडीच्या दुकानासमोर बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. तसेच शेवटल्या पाचव्या घटनेत आज, गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डिप्टी सिंग्नल रेल्वे फाटकाजवळ झोपड्यात राहणारे संजय परसराम शर्मा (40) हे मृतावस्थेत आढळून आले. या पाचही प्रकरणांत संबंधित पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com