अमरावती रेमडेसिव्हिर काळाबाजार : कंत्राटी डॉक्टरसह पाच जणांची हकालपट्टी, दोघांना जामीन

Remdesivir
Remdesivir e sakal

अमरावती : कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नवसंजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिव्हिरचा काळाबाजार उघडकीस आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने तडकाफडकी कंत्राटी डॉक्टरसह पाच जणांची आरोग्यसेवेतून हकालपट्टी केली. न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या पाचपैकी दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Remdesivir
गडचिरोलीत पोलिस-नक्षल चकमक : C60 जवानांनी दोन नक्षल्यांना घातले कंठस्नान

डॉ. अक्षय मधुकर राठोड (वय २४), शुभम शंकर किल्लेकर (वय २४), अनिल गजानन पजरकर (वय ३६), शुभम प्रमोद सोनटक्के (वय २४) व एक परिचारिका, अशा पाच जणांची कामावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. यातील चौघांसह तिवसा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन दत्तात्रेय मालुसरे (वय ३५) यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर परिचारिका व डॉ. अक्षय राठोड या दोघांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असता त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे उर्वरित तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी सांगितले. पहिल्या सहा जणांकडून पोलिसांनी दहा रेमडेसिव्हिर इंजेक्शन जप्त केले होते. त्यानंतर बुधवारी (ता.१२) उशिरा रात्री विनीत अनिल कुटाणे (वय २१, रा. खराळा) यालाही पोलिसांनी अटक केली. विनीतला आज न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. अटक झालेल्या सातपैकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याच्यावर क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

Remdesivir
मुंबई, पुण्याच्या तुलनेत नागपूरची आघाडी; आरोग्य यंत्रणेत सुधारणा
याप्रकरणात प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालुसरे याच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा, जप्त रेमडेसिव्हिरबाबत आरोग्य उपसंचालकांकडे अहवाल पाठविला आहे. त्याच्याविरुद्ध कारवाईबाबत वरिष्ठांकडून आदेश आलेला नाही.
-डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.

एकूण बारा रेमडेसिव्हिर जप्त -

वितीनकडूनही पोलिसांनी दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शन जप्त केले. त्यामुळे आतापर्यंत जप्त रेमडेसिव्हिरची संख्या एकूण बारा झाली. हे बारा इंजेक्शन या लोकांकडे कसे आले याचा शोध घेतला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com