
पूरबाधितांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार जमा
हिंगणघाट - तालुक्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे परिसरातील वना, यशोदा, वर्धा, धाम, बोर या नंद्यांना महापूर आला. या महापुरामुळे हजारो कुटुंब बाधित झाले. यात हिंगणघाट तालुक्यातील १ हजार ४४८ कुटुंबांना आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नाने मदत मिळाली. या पुरग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
आमदार समीर कुणावार यांनी मदतीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये सर्व खाते प्रमुखांची तत्काळ बैठक बोलवली. या बैठकित पुरबाधित लोकांच्या घराचे पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. भल्या पहाटे आपल्या सहकाऱ्यांना अधिकाऱ्यांना सोबत घेवून प्रत्येक घराची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे तयार केले. यानुसार तत्काळ मदत करण्याच्या सूचना केल्या. ही मदत पुग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना तहसीलदार सतीश मासाळ यांना केल्या.
अवघ्या ४८ तासात खावटीचे पाच हजार रुपये पुरस्तांच्या खात्यात जमा झाले. इतर पुरबाधितांचे पंचनामे करून मदत देण्यात येईल असे महसूल प्रशासनाकडुन सांगण्यात आले. त्याप्रमाणे आमदार समीर कुणावार यांनी स्वखर्चातून दोन हजार लोकांना दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ जेवणाची व्यवस्था केल्यामुळे पुरग्रस्तांना दिलासा मिळाला. या भागात मोठ्या प्रमाणात शेतीजेही नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे करू मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सर्वच विभागाचे कर्मचारी कार्यरत
हिंगणघाट शहरामध्ये ८०५ पुरबाधितांना तर ग्रामीणमध्ये ६४३ लोकांना अवघ्या ४८ तासात आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुरावा व प्रयत्नामुळे मदत देण्यामागे महसुल विभाग, नगर परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेवून केलेली मदत प्रशंसनीय आहे. प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतीश मासाळ, नगरपरिषद मुख्याधिकारी राजेश भगत, गट विकास अधिकारी मोहोड, नायब तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार समशेर पठाण, न.पा. अभियंता नासरे, माळवे, प्रवीण काळे, विशाल, ब्राह्मणकर, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, नगर पालिकेचे कर्मचारी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
Web Title: Five Thousand Deposit Each In The Accounts Of The Flood Victims
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..