पुरामुळे २४ हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले, पाच तालुक्‍यांना मोठा फटका

file photo
file photo
Updated on

चंद्रपूर : गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने ऑगस्ट महिन्यात वैनगंगा नदीला पूर आला. या पुराचा फटका जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांना बसला. या पाचही तालुक्‍यांतील २४हजार ५०९ हेक्‍टर क्षेत्रांवरील कापूस, धान, सोयाबीन, तुरीचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला आहे. मात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळेल की नाही याची शाश्‍वती नाही.

३० आणि ३० ऑगस्ट रोजी गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. यामुळे वैनगंगा नदीला पूर आला. या पुराचा फटका जिल्ह्यातील मूल, सावली, ब्रह्मपुरी, गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्‍यांना बसला. सर्वांत जास्त झळ ब्रह्मपुरी तालुक्‍याला बसली आहे.

या तालुक्‍यातील लाडज, पिंपळगाव, सोंदरी, हरदोनी यासह अन्य गावांत पाणी शिरले होते. हेलिकॉप्टरच्या मदतीने या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या सर्वच गावांतील पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. अनेकांची घरी पुराच्या पाण्यात कोसळली. जनावरेही वाहून गेली होती.

सर्वेक्षणाचे दिले निर्देश

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. याची दखल घेत कृषी विभागाने ब्रह्मपुरीसह मूल, सावली, गोंडपिंपरी, पोंभुर्णा या तालुक्‍यांतील पिकांचे सर्वेक्षण केले. याच सर्वेक्षणातून २४ हजार ५०९. ६५ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तसा अहवालही वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.

अवकाळीतही नुकसान

१९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जिवती आणि कोरपना तालुक्‍यात अतिवृष्टी झाली. या दोन्ही तालुक्‍यांतील कापूस, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. या दोन्ही तालुक्‍यांतील एक हजार २५३ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. नुकसानाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com