esakal | अक्षय तृतीयेला होणाऱ्या बालविवाहावर लक्ष; बालकल्याण समितीसह पोलिस विभाग सतर्क
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षय तृतीयेला होणाऱ्या बालविवाहावर लक्ष; बालकल्याण समितीसह पोलिस विभाग सतर्क

अक्षय तृतीयेला होणाऱ्या बालविवाहावर लक्ष; बालकल्याण समितीसह पोलिस विभाग सतर्क

sakal_logo
By
रूपेश खैरी

वर्धा : उत्तम मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya) मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याचे आतापर्यत पुढे आले आहे. हेच बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी बालकल्याण समिती (Child Welfare Committee), महिला व बाल विकास अधिकारी तसेच पोलिस विभागाचे अधिकारी कामाला लागले आहेत. (Focus on child marriage in Akshaya tritiya)

अक्षय तृतीया हा महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय बाल हक्‍क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा: शटर बंद खरेदी चालूच! आलिशानच्या दुकानात आढळले तब्बल पावणे दोनशे ग्राहक

त्याअनुषंगाने सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालकल्याण समिती, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पोलिस निरीक्षक, चाइल्ड लाइन, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडीसेविका यांना टाळेबंदीच्या कालावधीत अक्षय तृतीयेच्या दिवशी व त्यानंतरही होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

वर्षभरात राज्यात ५६० बालविवाह

कोविड १९ या आजाराच्या काळात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहेत. सततचे लॉकडाउन, बंद शाळा, बेरोजगारी यामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या एक वर्षाच्या काळात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात एकूण ५६० बालविवाह रोखण्यात महिला व बाल विकास विभागाला यश आले. जिल्ह्यात प्रतिबंध करण्यात आलेल्या २३ बालविवाहाचा त्यांत समावेश आहे.

हेही वाचा: याला म्हणतात माणुसकी! कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास उपचाराची रक्‍कम परत

बाल संरक्षण समितीची भूमिका महत्त्वाची

शासनाच्या सूचनेनुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांची बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची बालविवाह प्रतिबंधक सहायक म्हणून नियुक्ती केली आहे. ग्रामस्तरावर ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधात्मक अधिकारी म्हणून; तर अंगणवाडीसेविका यांची सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(Focus on child marriage in Akshaya tritiya)

loading image