Gondia News : ग्रामीण रुग्णालयात तीन रुग्णांची भर; बबई येथील विषबाधा प्रकरण, १६ जणांवर उपचार सुरूच

Food Poisoning : बबई येथील लग्न सोहळ्यात विषबाधा झाल्याने ४६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १६ रुग्णांवर उपचार सुरू असून, २८ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.
Gondia News
Gondia Newssakal
Updated on

गोरेगाव (जि. गोंदिया) : तालुक्यातील बबई येथील केशोराव बिसेन यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात वऱ्हाड्यांना जेवणातून विषबाधा झाली होती. ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे मंगळवारी (ता. ८) आणखी तीन रुग्ण दाखल झाल्याने रुग्णांची संख्या ४६ झाली आहे. यातील २८ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. १६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com