वर्धेत तिघांनी केला चिमुकलीवर अत्याचार

प्रवीण फुसाटे
Sunday, 9 August 2020

तक्रारीत पारधी बेड्यावरील विनोद विठ्ठल वरभे (३५, रा. इजाला) याच्यासह आणखी दोघे असल्याचे म्हटले आहे. यातील विनोद वरभे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यासोबत आणखी कोण होते याचा तपास सुरू आहे.

पुलगाव (जि. वर्धा) : आईसोबत झोपून असलेल्या चिमुकलीला उचलून नर्सरीत नेत तिच्यावर तिघांनी बळजबरी केली. ही घटना देवळी तालुक्यातील इंझाळा गावाच्या जवळ असलेल्या पारधी बेड्यावर सहा ऑगस्टच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. या चिमुकलीची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी पुलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंझाळा पारधीबेडा येथील सात वर्षीय चिमुकली घराबाहेर आईसोबत खाटेवर झोपून होती. यावेळी तिला तीन नराधमांनी उचलून जवळच्या नर्सरीमध्ये नेत अत्याचार केला. यानंतर तिला घटनास्थळी सोडून तिघांनी पोबारा केला. पीडिता रडत असल्याने आईली जाग आली. आईने तिला विचारले असता घटनेची माहिती आईला दिली. तिने तत्काळ घटनेची तक्रार पुलगाव पोलिस ठाण्यात नोंदविली.

उघडून तर बघा - नात्यातीलच युवतीशी ठेवले शारीरिक संबंध, नंतर दिला लग्नास नकार...

तक्रारीत पारधी बेड्यावरील विनोद विठ्ठल वरभे (३५, रा. इजाला) याच्यासह आणखी दोघे असल्याचे म्हटले आहे. यातील विनोद वरभे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यासोबत आणखी कोण होते याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव करीत आहे.

मुलीची प्रकृती स्थिर

पीडित मुलीवर पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव, पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी भेट दिली.

अधिक माहितीसाठी - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा

सामाजिक संस्थेने केले समुपदेशन

घटनेची माहिती मिळताच सामाजिक संस्था चालविणाऱ्या मंगेशी रमेश मुनला यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन केले व पुलगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिस पथकाने वेगाने तपास करण्यास सुरुवात केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forced by three on small girl in Wardha