esakal | जे झटले दुसऱ्याच्या संसारासाठी त्यांचेच हात आज रिकामे..वाचा मन हेलावून टाकणारी बातमी..  
sakal

बोलून बातमी शोधा

forest department did not give payment to labors.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी गावाचे तालुक्‍यातील सालोरी गावानजीक पुनर्वसन करण्यात आले. हे काम काही मजुरांकडून करण्यात आले. मात्र, ज्यांनी दुसऱ्याचे संसार सावरले त्यांचेच हात आज रिकामे आहेत. 

जे झटले दुसऱ्याच्या संसारासाठी त्यांचेच हात आज रिकामे..वाचा मन हेलावून टाकणारी बातमी..  

sakal_logo
By
श्रीकांत पशेट्टीवार

वरोरा(जि. चंद्रपूर): कोरोनामुळे सर्वांवर आर्थिक संकट आले आहे. त्यात मजुरांवर मजुरी मिळत नसल्याने संकटांचा डोंगर कोसळला आहे. सरकारकडून वारंवार कोणाचाही पगार रोखून न ठेवण्याबाबत सूचना येत आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभागात काम करणाऱ्या मजुरांचे अक्षरशः हाल होत आहेत. 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी गावाचे तालुक्‍यातील सालोरी गावानजीक पुनर्वसन करण्यात आले. हे काम काही मजुरांकडून करण्यात आले. मात्र, ज्यांनी दुसऱ्याचे संसार सावरले त्यांचेच हात आज रिकामे आहेत. 

अधिक वाचा - तंबाखू खाणाऱ्यांचे आता होणार हाल..कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विक्रेत्यांनी कसली कंबर.. वाचा सविस्तर

मजुरीची रक्कम मिळाली नाही 

काम होऊन तब्बल आठ महिन्यांचा काळ लोटूनही पुनर्वसनासाठी झटणाऱ्या हातात मजुरीची रक्कम मिळालेली नाही. वनविभागाच्या कार्यालयात चकरा मारूनही काहीच तोडगा न निघाल्याने अखेर मुख्य वनसंरक्षकांकडे मजुरांनी तक्रार केली आहे. 

एका बैलबंडीने केले काम 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून पुनर्वसित करण्यात आलेल्या रानतळोधी गावात वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने उर्वरित कामे करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात 22 मजूर आणि एका बैलबंडीने कामे करण्यात आली. बैलबंडीला प्रतिदिन एक हजार रुपये, मजुरांना प्रतिदिन 341 रुपये मजुरी देण्याचे निश्‍चित झाले. 22 मजुरांनी 278 दिवस, तर बैलबंडीने 17 दिवस काम केले.

कार्यालयातून उडवाउडवीची उत्तरे 

काम पूर्ण झाल्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालयात मजुरीबाबत विचारणा करण्यात आली. परंतु, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आठ महिने लोटूनही मजुरांना मजुरी देण्यात आलेली नाही. उलट, ज्यांनी कामावर रुजू केले त्यांच्याकडून मजुरी मागण्याचा सल्ला वनाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे संतप्त मजुरांनी मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार करीत मजुरी देण्याची मागणी केली आहे. आठ महिने लोटूनही मजुरी न मिळाल्याने मजुरांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

जाणून घ्या - घरात सापडलेली तांब्याची वस्तू निघाली तब्बल 1500 वर्ष जुनी; इतिहास बघितला आणि सर्वांनाच बसला धक्का..

मजुरी पाठवण्यात आली आहे 
मजुरांची तक्रार प्राप्त झाली आहे. मात्र, मजुरांची मजुरी वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे यापूर्वीच पाठविण्यात आली आहे. त्यानंतर नेमके काय झाले, याबाबत माहिती नाही. 
- अशोक सोनकुसरे, 
विभागीय वनाधिकारी, चंद्रपूर. 

संपादन - अथर्व महांकाळ