Forest Department: वनविभागाला गवत बिया विक्रीतून दहा लाखांचा नफा; अनेक राज्यांतून मागणी, मुरडा उपवन क्षेत्रात गवत बी संकलन प्रकल्प
Sustainable Development: वरोरा वनपरिक्षेत्रातील मुरडा उपवन क्षेत्रात सुरू केलेल्या गवत बी संकलन प्रकल्पाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या प्रकल्पातून तब्बल दहा लाखांचा नफा वनविभागाला झाला.
वरोरा : वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाने मागीलवर्षी मुरडा उपवन क्षेत्रात गवत बी संकलन केंद्र सुरू केले. जंगलातील वेगवेगळ्या प्रजातींच्या गवताची लागवड करण्यात आली. यंदा या गवताच्या बियांना अनेक राज्यांतून मोठी मागणी झाली.