वनविभागाने पाठविलेल्या पत्राला गोधरा वनविभागाने उत्तर दिले आहे. गोधरा वनविभागाचे पत्र सोमवारी पोस्टाव्दारे मिळाले आहे. यात सागवान पाठविताना हॅमर मारल्याचा उल्लेख आहे.
यवतमाळ : गुजरातवरुन 'विना हॅमर'सागवान साठा थेट यवतमाळात आला आहे. याची शहानिशा करण्यासाठी यवतमाळ ‘डीएफओ’नी गोधरा वनविभागाला (Forest Department) पत्र लिहून माहिती मागितली होती.
गुजरात (Gujarat) येथील सागवानसाठा यवतमाळात (Yavatmal) सापडल्यानंतर वनविभाग अॅक्शन मोडवर आले होते. परराज्यातून सागवान आल्यानंतरही यावर ‘हॅमर’ नसल्याने वनविभाग च्रकावला होता. ‘टीपी’जोडल्याने माल वैध की अवैध याची शहानिशा वनविभागाने सुरू केली. वनविभागाला या प्रकरणात तस्करीचाही संशय आल्याने खातरजमा करण्यासाठी यवतमाळ वनविभागाने गुजरात मधील गोधरा वनविभागाला पत्र लिहिले होते.