esakal | वाघिणीला बंदिस्त करण्यासाठी वनविभागाच्या हालचाली
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

वाघिणीला बंदिस्त करण्यासाठी वनविभागाच्या हालचाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : ब्रह्मपुरी वनविभागातून मेळघाटच्या जंगलात सोडलेल्या "ई-वन' वाघिणीचा मुक्तसंचार सुरूच आहे. झालेली मानवी हानी लक्षात घेता तिला बेशुद्ध करून बंदिस्त करण्याला प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी हिरवी झेंडी दिली.
धारणी तालुक्‍यातील दादरा गावातील शेतकरी शोभाराम चव्हाण (वय 52) यांच्यावर वाघिणीने शेतात हल्ला करून ठार मारल्यानंतर ग्रामस्थांमध्ये वनविभाग व पोलिसांप्रती रोष कायम आहे. त्यामुळे वनविभागाच्या पथकाला पोलिस संरक्षणात जंगलात काम करावे लागत आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असताना वाघिणीला बेशुद्ध करून बंदिस्त करण्याची अनुमती मिळाल्यानंतर मेळघाट व्याघ्रप्रकल्प व उपवनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग यांचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. त्यात जलद बचाव कृतिदल, मेळघाट व्याघ्रप्रकल्प अमरावती, पेंच व्याघ्रप्रकल्प नागपूर, जलद बचाव कृतिदल अमरावती, असे वनअधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक जंगलातील हालचालीवर लक्ष्य ठेवून आहेत. ई-वन वाघिणीला रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे. तिचा क्षेत्रनिहाय मागोवा जंगलात सोडले त्या 1 जुलै 2019 पासूनच घेतल्या जात आहे. 2 जुलै रोजीच या वाघिणीने केकदाखेडा गावात सात वर्षांच्या ललिता राधेश्‍याम डावर या मुलीवरसुद्धा झडप घेऊन गंभीर जखमी केले होते.

पाळीव प्राणी, व नागरिकांवर ई-वन वाघिणीकडून हल्ले झाल्यानंतर जे प्रयत्न करायला हवे ते वनविभागाने केले. त्या वाघिणीला लवकरच बंदिस्त केल्या जाईल. नागरिकांनी संयम ठेवावा.
-एम. एस. रेड्डी, क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्रप्रकल्प, अमरावती.

loading image
go to top