Gutka Seizure: गुटख्याच्या पोत्यांनी भरलेली गाडी वनविभागाकडून जप्त; पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाचे झोपेचे सोंग?
Forest Department: हिवरखेडमध्ये वन विभागाच्या फिरते पथकाने गुटख्याच्या पोत्यांनी भरलेली गाडी आणि दोन मोटरसायकली जप्त केल्या. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हिवरखेड : वन विभागाच्या फिरते वन पथकाकडून, गुटख्याच्या पोत्यांनी भरलेली चार चाकी गाडी आणि दोन मोटरसायकली जप्त करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने अर्थपूर्ण झोपेचे सोंग घेतल्याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.