esakal | चुंचुवार कुटुंबावर कोसळला दुखाचा डोंगर; मुलाच्या मृत्यूची वार्ता समजताच वडिलांनीही सोडले प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

Former corporator Gajanan Chunchuwar dies in Chandrapur

अत्यंत मुदू स्वभावाचे असलेल्या गजानन चुंचूवार यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता कानावर आल्याचा मोठा धक्का वडिलांनाही बसला. काही क्षणातच त्यांनीही प्राण सोडले. वडील आणि मुलाच्या निधनाने तुकूम परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

चुंचुवार कुटुंबावर कोसळला दुखाचा डोंगर; मुलाच्या मृत्यूची वार्ता समजताच वडिलांनीही सोडले प्राण

sakal_logo
By
बाळू जीवने

चंद्रपूर : शहरातील तुकूम प्रभागाचे माजी नगरसेवक गजानन चुंचुवार यांचे रविवारी (ता. 13) रात्री आठ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कानावर आल्यावर वडिलांची प्रकृती खालावली. त्यांचाही काही क्षणातच मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायण चुंचुवार आहे.

माजी नगरसेवक गजानन चुंचुवार हे काँग्रेसमध्ये होते. आक्रमक नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. रविवारी अचानक त्यांची प्रकृती खालविली. त्यांना चंद्रपुरात योग्य तो उपचार न मिळाल्याने तेलंगाणा येथे नेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. तेलंगाणा राज्यातील मंचेरियल गावाजवळ पोहोचत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

क्लिक करा - "नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत

अत्यंत मुदू स्वभावाचे असलेल्या गजानन चुंचूवार यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता कानावर आल्याचा मोठा धक्का वडिलांनाही बसला. काही क्षणातच त्यांनीही प्राण सोडले. वडील आणि मुलाच्या निधनाने तुकूम परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

वर्धा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी असतानाही मशिनरीच्या मदतीने अवैध वाळूचा उपसा केला जात होता. वाळू काढण्यात आलेल्या जागी मोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यातील पाण्यात बुडून दिनेश कन्नाके याचा मृत्यू झाला. तालुक्‍यातील बोरी गावाजवळ ही घटना घडली. दरम्यान, याला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करावी तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही, असा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

मृत हा बोरी-आमडी येथील रहिवासी आहे. बोरी-आमडी शेतशिवारातूनच वर्धा नदी वाहते. सध्या शासनाने वाळू घाटांचे लिलाव केले नाही. मात्र, वर्धा नदीच्या घाटावरून मोठ्या प्रमाणावर मशिनरीच्या मदतीने वाळूचा उपसा करण्यात येत आहे. रविवारी मृत आणि त्याचे सहकारी या पाण्यात असलेले जनावरे काढत होते. तेव्हाच खड्ड्यात बुडून दिनेश कन्नाके याचा मृत्यू झाला.

गावात या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मात्र, मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन करणार नसल्याचा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला. वृत्तलिहेस्तो शवविच्छेदन झाले नव्हते. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली.

संपादन - नीलेश डाखोरे