प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..   

गणेश बर्वे 
Saturday, 12 September 2020

घरी गेल्यावर मातेची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिला उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथून या मातेला नागपूरला हलविण्यात आले.

तुमसर (जि. भंडारा) : सुकळी येथील कोमल मुन्ना बोंद्रे ही दुसऱ्यांदा गर्भवती होती. तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. 31 ऑगस्टला तिच्यावर शस्त्रक्रिया करून मुलीचा जन्म झाला. दोन दिवसानंतर मात्र, या महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्‍टरांना सांगण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी कोणतेही उपचार न करता काही औषध देऊन घरी रवाना केले. 

घरी गेल्यावर मातेची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिला उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथून या मातेला नागपूरला हलविण्यात आले.

ठळक बातमी - काय सांगता! नागपुरातील या तलावातून होतो चक्क एका मोठ्या नदीचा उगम; जाणून घ्या काय काय आहे इतिहास

तुमसर उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया झाल्यानंतर मातेला असहाय्य वेदना होत होत्या. तिला उपचारासाठी नागपूर येथे रुग्णालयात दाखल केले. तेथे शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटात रक्ताचे गोळे आढळून आले. यातील कोमल मुन्ना बोंद्रे (वय 27) या मातेचा मृत्यू झाला. आज, तिच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात घेराव करून शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

नागपूर येथील खासगी रुग्णालयात मातेवर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, डॉक्‍टरांनी तिच्या पोटातून रक्ताचे गोळे आणि घाण पाणी निघाले, अशी माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर एक दिवसातच मातेचे निधन झाले.

हेही वाचा - वीज ग्राहकांनो लक्ष द्या! अचूक वीजबिल हवंय? मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..

याप्रकारणात उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणा केल्याचा आरोप करीत मृताचे नातेवाईक व गावकऱ्यांनी डॉक्‍टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी येथील पोलिस ठाण्यात गर्दी केली. पोलिस निरीक्षक पिपरेवार यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर गावकऱ्यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood Clots found in womans stomach after delivery