
Yashomati Thakur
sakal
अमरावती : महाराष्ट्राच्या राजकारणात संस्कार, मर्यादा आणि माणुसकीची मूल्ये जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याविरुद्ध वापरलेली भाषा ही फक्त एका व्यक्तीचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अवमान आहे, अशी टीका माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.