
रविवारी देशभरात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात रामनवमी साजरी करण्यात आली. दरम्यान, वर्ध्यात रामनवमीच्या कार्यक्रमावेळी राम मंदिराच्या गाभाऱ्यात माजी खासदार रामदास तडस यांना प्रवेश नाकारण्यात आला. जानवं न घातल्यानं आणि सोवळं न नेसल्यानं पुजाऱ्यांनी त्यांना गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप होत आहे.