देवळी परिसरात अपघाताची शृंखला; चार अपघातात तीन ठार चार जखमी

शेख सत्तार
Wednesday, 30 December 2020

पहिला अपघात सोमवारी रात्री दरम्यान एसएसएनजे महाविद्यालयाजवळ झाला. या अपघातात न. प. पाणीपुरवठा कर्मचारी राजू सरकार (वय 45) याला मागाहून येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिली.

देवळी (जि.वर्धा) : वर्धा-यवतमाळ या चौपदरी महामार्गावर अपघाताचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. वर्षाच्या अखेरीस देवळी ते भिडी या परिसरात येणाऱ्या भागात दोन दिवसात चार अपघात झाले. यामध्ये तीन अपघातात तिघे ठार झाले तर चार व्यक्‍ती जखमी झाले. मृतांत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

पहिला अपघात सोमवारी रात्री दरम्यान एसएसएनजे महाविद्यालयाजवळ झाला. या अपघातात न. प. पाणीपुरवठा कर्मचारी राजू सरकार (वय 45) याला मागाहून येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिली. राजू सुरकार हा धाब्यावर जेवण करण्यास गेला होता. दुसरा अपघात देवळी येथील रत्नापूर मधील भागात मठाजवळ झाला. सोमवारी रात्री 11 वाजता यवतमाळ वरून वर्धेकडे एम. एच. 31 डीजे 0081 या क्रमांकाच्या कारने समोरून येणाऱ्या एम. एच. 32 एके 0159 क्रमांकाच्या मालवाहू गाडीला धडक दिली. 

अति घाई संकटात नेई! शासनाची घाई लोकप्रतिनिधींच्या मुळावर; थेट सरपंच निवडीचा निर्णय...

या अपघातात कार चालक राजू मनोहर लढी (वय 40) रा. सालोड हा जागीच ठार झाला. तसेच मालवाहक वाहनचालक सचिन वासुदेव परतपुरे (वय 24) रा. वाबगाव हा जखमी झाला. कारमधील दारू परिसरातील नागरिकांनी पळविल्याचे सांगण्यात येत आहे. तिसरा अपघात मंगळवारी दुपारी एक ते दोन वाजताच्या दरमयानात वाटखेडा चौफुलीवर झाला. एम. एच. 40 बी. ई. 3014 क्रमांकाच्या कारने दुचाकी मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने मोटार सायकल अशोक विठोबा राऊत (वय 40) रा. वणोजा ता. राळेगाव हा जागीच ठार झाला. 

तर दुचाकी चालक चालक देवराव तायवाडे रा. वणोजा हा जखमी झाला. कार अडेगाव मार्गे देवळीला येत होती. मोटार सायकल अंदोरी वरून येत होती. कार भरधाव असल्याने वाटखेडा चौफूलीवर दोघात धडक झाली.

Look Back 2020: वर्षभरात तब्बल ९० हत्याकांडांनी हादरली...

चौधार अपघात यवतमाळवरून वर्धेकडे जाणाऱ्या एम. एच. 31 सी एम. 973 क्रमांकाच्या कारला झाला. टायर फुटल्याने ही उलटली. यात प्राणहानी झाली नाही. चालक किशोर रोकडे रा. महादेवपूरा वर्धा यांनी पोलिसात तक्रार नोंदवली नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four accidents in Deoli wardha district