
चंद्रपूर : शहरातील अष्टभुजा वॉर्डातील एका युवकाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा करून तपासाची चक्रे फिरवली. रामनगर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासांत खून करणाऱ्या चार आरोपींना अटक केली.