Washim Accident : ‘समृद्धी’वरील अपघातात एकाच कुटुंबातील चार ठार; उमरेडच्या जयस्वाल कुटुंबावर शोककळा, चालक गंभीर जखमी

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात उमरेड येथील जयस्वाल कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला. अपघातामुळे चालक गंभीर जखमी झाला असून उपचार सुरू आहेत.
Washim Accident
Washim Accidentsakal
Updated on

वाशीम : भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, कार चक्काचूर झाली. ही घटना गुरुवारी (ता. ३ जुलै) रात्री समृद्धी महामार्गावरील शेलुबाजार (वाशीम) इंटरचेंज जवळ घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com