कोण म्हणते ‘बर्ड फ्लू’ आहे? आता हेच बघा ना चोरट्यांनी चोरल्या तब्बल ४०० कोंबड्या

टीम ई सकाळ
Tuesday, 2 February 2021

एवढ्या मोठ्या संख्येत कोंबड्या चोरीला गेल्याने व्यावसायिकावर संकट ओढवले आहे. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मोहाडी (जि. भंडारा) : पोल्ट्रीफार्ममधून ८४ हजारांच्या कोंबड्या चोरून नेल्याची घटना शनिवारी सिरसोली शेतशिवारात घडली. सर्वत्र ‘बर्ड फ्लू’चे सावट असताना चोरट्यांनी कुक्कुटपालन केंद्रातून एक-दोन नव्हे तब्बल ४०० कोंबड्या लंपास केल्या. ही घटना मोहाडी तालुक्याच्या सिरसोली येथे रविवारी उघडकीस आली.

बर्ड फ्ल्यूमुळे व्यावसायिक आधीच त्रस्त आहेत. त्यातच संजीव मुटकुरे यांच्या शेतावर असलेल्या पोल्ट्रीफार्मच्या दाराचे कुलूप चोरट्यांनी तोडले. तेथून लोअर जातीच्या २०० नग किंमत १४,३००, पॅरेल जातीच्या १२५ नग किंमत ५७,५०० रुपये, कॉकरेलच्या ४२ किंमत ८,५५०, बॉयलर जातीच्या २५ नग किंमत ४०५०, इलेक्ट्रिक मदरबोर्ड असा ८६,४०० रुपयांचा माल चोरून नेला. एवढ्या मोठ्या संख्येत कोंबड्या चोरीला गेल्याने व्यावसायिकावर संकट ओढवले आहे. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

नक्की वाचा - फडणवीसांचा सवाल; ‘अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेले मुलीचे लग्न कसे करू?’, पीएफसाठी धडपड

भंडारा येथील संजीव मुटकुरे यांचे सिरसोली येथे कुक्कुटपालन केंद्र आहे. चोरट्यांनी त्यांच्या कुक्कुटपालन केंद्रातून ४०० कोंबड्या चोरून नेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी संजीव हे कुक्कुटपान केंद्रात गेले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four hundred hens stolen from Bhandara Poultry Farm

Tags
टॉपिकस
Topic Tags: