esakal | कौंडण्यपूर परिसरातून वाळूचोरीचे चार ट्रॅक्टर जप्त, तहसीलदारांनी वाळूमाफियांवर ठोठावला दंड
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शुक्रवारी (ता. २५) रात्री दोन वाजताच्या सुमारास वाळू चोरट्याची माहिती तिवसा महसूलला मिळाली. तहसीलदारांनी पोलिसांच्या मदतीने घटनास्थळाकडे धाव घेत कौंडण्यपूर येथून वाळू चोरीचे चार ट्रॅक्टर जप्त केले. त्यानंतर वाळूमाफियांवर दंड ठोठावण्यात आला.

कौंडण्यपूर परिसरातून वाळूचोरीचे चार ट्रॅक्टर जप्त, तहसीलदारांनी वाळूमाफियांवर ठोठावला दंड

sakal_logo
By
प्रतीक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : तालुक्यातील कौंडण्यपूर नदी परिसरात शुक्रवारी (ता. २५) मध्यरात्री तहसीलदार फरतारे व कुऱ्हा पोलिसांच्या मदतीने वाळूचोरीच्या चार ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे या भागातील वाळू चोरट्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

तिवसा तालुक्यातील वाळूघाटांचा लिलाव अनेक वर्षापासून रखडला असल्याने तिवसा महसूलअंतर्गत येणाऱ्या नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी केली जात होती. मात्र अजय दलाल हत्याकांडानंतर काही दिवस वाळूमाफिया शांत असल्यामुळे वाळूच्या चोरीला ब्रेक लागल्याचे चित्र होते.

डोंग्याच्या मदतीने वाळूचोरी

मात्र यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाल्याना पूर आला. नदीपात्रात मोठ्याप्रमाणात वाळू आली. त्यामुळे काही दिवसातच वाळूमाफियांनी तालुक्यातील नदी भागात आपला मोर्चा वळविला आहे. कौंडण्यपूर नदीपात्रातील वाळू डोंग्याच्या मदतीने एका ठिय्यावर जमा करून त्याठिकाणावरून ट्रॅक्टरने पळविली जात आहे.

जाणून घ्या  : आजारातून बरे होण्याची संपूर्ण यंत्रणा आपल्या शरीरातच! जाणून घ्या कोविड रुग्णांसाठी प्राणायाम

वाळूमाफियांवर ठोठावला दंड

कौंडण्यपूर येथून वर्धा नदी गेल्याने याठिकाणीसुद्धा मोठ्याप्रमाणात वाळूमाफियाची टोळी सक्रिय आहे. शुक्रवारी (ता. २५) रात्री दोन वाजताच्या सुमारास वाळू चोरट्याची माहिती तिवसा महसूलला मिळाली. तहसीलदारांनी पोलिसांच्या मदतीने घटनास्थळाकडे धाव घेत कौंडण्यपूर येथून वाळू चोरीचे चार ट्रॅक्टर जप्त केले. त्यानंतर वाळूमाफियांवर दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई तहसीलदार वैभव फरतारे, नायब तहसीलदार पंधरे व कुऱ्हा पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

loading image
go to top