
दारव्हा (जि. यवतमाळ) : शहरात बुधवारी (ता. २०) घडलेल्या एका घटनेने संपूर्ण समाजमन हळहळले. चार शाळकरी मुलांच्या मृत्यूने काळजाचा ठाव घेतला. रेल्वे उड्डाण पुलासाठी खणलेल्या खड्ड्यात ही मुले बुडून मृत्युमुखी पडली. आज गुरुवारी (ता. २१) त्या चारही मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईवडिलांचा आक्रोश, हुंदके, अश्रू पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.