Video : जानेफळात उडाला आगडोंब; आगीत चार दुकाने भस्मसात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

एक मिठाईची दुकान, एक मोबाईलची दुकान, किराणा दुकान व कृषी केंद्र जळून खाक झाले. या आगीत दोन कोटींचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

जानेफळ (जि.बुलडाणा) : मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथे दुकानांना सकाळी साडेचार वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार दुकाने जळून भस्मसात झाली आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी व नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या आगीमध्ये व्यापाऱ्यांचे दोन कोटींचे नुकसान झाले असल्याचा अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे. 

जानेफळ बसस्थानक परिसरातील दुकानांना आग लागल्याचे सकाळी निदर्शनास आले. आग विझविण्यासाठी मेहकर व लोणार नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. वेळ प्रसंगी वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तसेच जालना येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

ब्रेकिंग - सावधान...महावितरणच्या नावाने होतेय फसवणूक

अन् सिलेंडरच्या स्फोटाने हादरला परिसर
या आगीत दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटाने परिसरात मोठा आवाज झाला. यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले. परंतु स्थानिक अग्निशमन दल व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आग विझविण्यासाठी पाण्याच्या टॅंकरची तसेच आग प्रतिरोधक उपाय योजना करण्यात आल्याने इतर जिल्ह्यातील अग्निशामक यंत्रणा बोलविण्याची गरज भासली नाही. 

अवश्य वाचा - सांगा आता रोडगा भाजणार कसा

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
मात्र, ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आगीत चार दुकाने जळून भस्मसात झाली आहे. यामध्ये एक मिठाईची दुकान, एक मोबाईलची दुकान, किराणा दुकान व कृषी केंद्र जळून खाक झाले. या आगीत दोन कोटींचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four shops burned in janefal