गरम पाण्याच्या नळाची तोटी तुटून चार विद्यार्थी भाजले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

धामणगाव येथील डॉ मुकुंदराव पवार सैनिकी शाळेत पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. निवासी शाळेतील इयत्ता दुसरी व तिसरीचे काही विद्यार्थी आंघोळ करण्याकरिता बाथरूममध्ये गेले होते. काही विद्यार्थी याठिकाणी ब्रश करीत होते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरिता चार महिला कर्मचारी सुद्धा होत्या. इतर विद्यार्थ्यांचे कपडे काढत असताना दुसऱ्या बाजूकडील गरम पाण्याचा नळ तोटी सकट बाहेर पडला

धामणगाव रेल्वे - बाथरूममध्ये आंघोळी व ब्रश करण्याकरिता गेले असताना गरम पाण्याच्या नळाची तोटी तूटून झालेल्या अपघातात एक विद्यार्थी 42 टक्के पाठीच्या बाजूने भाजला असून तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (ता.25) घडली. दरम्यान शाळा प्रशासनाने तत्काळ सर्व जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार केले. त्यानंतर अधिक उपचारार्थ अमरावती येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

सविस्तर वाचा - बचतगटाच्या बेजबाबदारपणाला लगाम घालण्यासाठी करणार हे...

धामणगाव येथील डॉ मुकुंदराव पवार सैनिकी शाळेत पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. निवासी शाळेतील इयत्ता दुसरी व तिसरीचे काही विद्यार्थी आंघोळ करण्याकरिता बाथरूममध्ये गेले होते. काही विद्यार्थी याठिकाणी ब्रश करीत होते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरिता चार महिला कर्मचारी सुद्धा होत्या. इतर विद्यार्थ्यांचे कपडे काढत असताना दुसऱ्या बाजूकडील गरम पाण्याचा नळ तोटी सकट बाहेर पडला. त्या नळातील गरम पाणी अंगावर पडल्याने प्रीत बराते याच्यासह शिवा नरेश चव्हाण ( 8 वर्ष),गणेश शामराव ठाकरे ( 9 वर्ष) , मोहित दीपक चव्हाण ( 7 वर्ष ) असे चार विद्यार्थी भाजले. घटनेचे गांभीर्य ओळखून मुकुंदराव पवार शैक्षणिक प्रतिष्ठानचे सचिव शिवाजी पवार यांनी कर्मचाऱ्यांसमवेत तत्काळ चारही जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयात चारही विद्यार्थ्यांवर डॉ. आशिष सालनकर,डॉ. मुबशिर खान यांनी प्रथमोपचार केले. दरम्यान प्रीत बराते हा विद्यार्थी 42 टक्के भाजला आहे. चारही विद्यार्थ्यांना अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्याची प्रकृती ठिक असल्याची माहिती आहे. या अपघाताची माहिती शाळा प्रशासनाने दत्तापुर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी अधिक तपास परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी तथा ठाणेदार कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे यांच्यासह सचिन गायधने,मंगेश लकडे करीत आहे.

दक्षता व खबरदारी घेण्यात येते
शाळेमध्ये निवासी राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसंदर्भात नेहमीच दक्षता व खरबदारी घेण्यात येते. असे संस्थेचे सचिव शिवाजी पवार यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four students injured by hot water in school hostel