
Buldhana News
sakal
नांदुरा / मलकापूर : बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा तालुक्यात नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेली चार मुले बुडाल्याची घटना रविवारी (ता.२८) रोजी घडली. यातील एका मुलाचा मृतदेह सापडला असून तिघे जण अद्यापही बेपत्ता आहेत. रात्री उशिरापर्यंत दोन्ही ठिकाणी बचाव पथकाकडून शोध मोहीम सुरू होती.