डब्बा पार्टीला गेले, तलावात पोहायला जाणं बेतलं जीवावर; बहीण-भावासह चौघांचा मृत्यू, चौघे १२ ते २१ वयाचे

दहा जण दुपारी दीडच्या सुमारास घातखेडा तलाव परिसरात आले होते. तलावाच्या वरील काठावर त्यांनी जेवण केले. त्यानंतर पोहायला गेले असता बुडून चौघांचा मृत्यू झाला.
Four Including Siblings Drown in Ghatkheda Lake Tragedy

Four Including Siblings Drown in Ghatkheda Lake Tragedy

Esakal

Updated on

अमरावती शहरालगत असलेल्या घातखेडा तलाव परिसरात डबापार्टी करण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सख्ख्या बहीण-भावाचाही समावेश आहे. रविवारी (ता. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. मानव ऊर्फ आदित्य नरेंद्र जोशी (वय १४), सोनाली नरेंद्र जोशी (वय १६), पायल बबलू पंडित (वय २१) आणि यश गजानन काकणे (वय १३, सर्व रा. महाजनपुरा, खोलापुरीगेट, अमरावती) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या चौघांची नावे असल्याची माहिती फ्रेजरपुराचे पोलिस निरीक्षक रोशन शिरसाट यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com